जयपूर (राजस्थान) येथे दि. २७ व २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या १० व्या Distribution Utility Meet (DUM 2026) या राष्ट्रीय परिषदेत महावितरणच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने सक्रिय सहभाग नोंदवला. इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम (ISGF) आयोजित या परिषदेत देशभरातील ४० हून अधिक वीज वितरण कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
या परिषदेत महावितरणचे कार्यकारी संचालक (वीज खरेदी) श्री. दिनेश अग्रवाल यांनी ‘वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक परिवर्तन आणि भांडवली बाजारासाठी सज्जता’ या विषयावर सादरीकरणातून विविध मुद्दे व तथ्ये मांडत उपाययोजनांची माहिती दिली. वीज वितरण कंपन्यांची आर्थिक शाश्वतता, भांडवली बाजारातील नव्या संधी आणि शाश्वत विकास या विषयांवरील त्यांचे विचार परिषदेत उपस्थित वीज क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रशंसनीय ठरले.
वीज वितरण क्षेत्र आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम, कार्यक्षम आणि शाश्वत करण्याच्या दिशेने महावितरणचा परिषदेतील सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
#Mahavitaran #MSEDCL
002598




















